मुंबईत मध्यम गटासाठी म्हाडाचा उत्तम पर्याय स्वप्नपूर्ती मुलुंड

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई मंडळातर्फे विविध भागातील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली. मुंबईतील विविध भागात 2030 घरांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली. सुरुवातीला घरांच्या नोंदणीसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुंबईकरांची मागणी लक्षात घेऊन म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. यासोबतच विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किमतीही म्हाडाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. विकासकांकडून घेतलेल्या 370 घरांच्या किमती सरासरी 12 लाख रुपयांवरून 75 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या. मात्र, म्हाडाने मुंबईतील कुर्ल्यातील 14 घरांच्या किमती वाढवल्याचे समोर आले आहे. नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Buy 4 BHK Villament in Marine Lines, South Mumbai. Book now. Experience Urban Living at the Prime Location of South Mumbai

वाचा : नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

कुठल्या घरांच्या किंमती वाढल्या?

म्हाडाने 8 ऑगस्ट रोजी मुंबई विभागाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीनुसार मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या जाहिरातीत स्वानंद सहकारी गृहनिर्माण संस्था इमारत क्रमांक 33 नेहरूनगर, कुर्ला येथील 14 घरांची किंमत 43.97 लाख ते 45.40 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी या घरांच्या किमती 13 लाख रुपयांनी वाढवण्यात आली. आता या घरांची किंमत 58.63 लाख रुपये करण्यात आली आहे.

वाचा : मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

म्हाडानं काय म्हटलं?

या 14 घरांच्या किमती का वाढल्या याबाबत म्हाडाने आपली भूमिका मांडली आहे. या घरांच्या किमती वाढण्यामागे मूल्यांकनात तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील घरांच्या किमतीचा रेडी रेकनर दर 77540 रुपये ठेवण्यात आला होता. मात्र, त्या भागातील रेडी रेकनरचा दर 1 लाख 25 हजार 170 रुपये होता. म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही बाब समोर आल्यानंतर रेडी रेकनरनुसार 20 टक्के रक्कम वजा करून घराची किंमत निश्चित करण्यात आली.

वाचा : पुण्यात 1190 घरांची योजना जाहीर, 16 लाखात मिळणार फ्लॅट

मुंबईतील घरांच्या नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. त्या निर्णयानुसार ही मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. मुंबईतील घरांची लॉटरी 8 ऑक्टोबरला होणार आहे. ज्यांना घरे मिळालेली नाहीत त्यांना 9 ऑक्टोबरपासून डिपॉझिट रिफंड देणे सुरू होणार आहे. ज्या नागरिकांना मुंबईत घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदवायचा आहे, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता ऑनलाइन अर्ज भरावा.

पहा मुलुंड स्वप्नपूर्ती येथील 2 bhk सॅम्पल फ्लॅट | mumbai under construction projects

वाचा : नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

Leave a Comment