CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण सिडकोची नवी मुंबईत 25 हजार घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. तुम्हालाही या लॉटरीत सहभागी व्हायचे असेल आणि घर मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते सांगणार आहोत.
सिडको सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी घरे देते. आजपर्यंत मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हजारो नागरिकांनी सिडकोच्या माध्यमातून प्रत्यक्ष घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यावेळीही सिडको मोठ्या प्रमाणात घरांच्या विक्रीसाठी जाहिराती देणार आहे. सध्या, सिडकोने 27 ठिकाणी 67,000 गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 43 हजार घरांना ‘महारेरा’ने मंजुरी दिली आहे. या सर्व घरांच्या बांधकामाचे काम सुरू असून यातील 25 हजार घरांच्या विक्रीसाठी सिडको जाहिराती देणार आहे.
मोक्याच्या ठिकाणी घरं
सिडकोची ही सर्व घरे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून यातील अनेक घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये नवी मुंबईतील मानसरोवर, खारघर, जुईनगर, वाशी, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली आणि करंजाडे येथील गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे. सिडकोचे हे गृहनिर्माण प्रकल्प नवी मुंबईतील बस डेपो, रेल्वे स्थानके आणि विमानतळ परिसरात मोक्याच्या ठिकाणी आहेत.
कोणाला करता येणार अर्ज?
महाराष्ट्रात राहणारे नागरिक या सोडतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जदार किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराकडे ते सिद्ध करणारे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असल्यास काही फरक पडत नाही, तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. लक्षात घ्या की तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा देखील सादर करावा लागेल. जर तुम्ही सिडको लॉटरीत EWS ग्रुप हाऊससाठी अर्ज करणार असाल तर तुमचे उत्पन्न दरमहा 25 हजार रुपयांच्या आत असावे. तसेच, तुमचे उत्पन्न 25 हजार ते 50 हजार रुपये दरमहा असेल तर तुम्ही एलआयजी ग्रुप हाऊसिंगसाठी अर्ज करू शकता. उत्पन्न दर्शविण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
कोणती कागपत्रे लागणार ?
आधार कार्ड
पॅन कार्ड
महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)
इनकम सर्टफिकेट
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचे फोटोज
जन्म प्रमाणपत्र
अर्जदारांचे संपर्क तपशील
बँक तपशील
वाचा : म्हाडाच्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; इच्छुकांसाठी मोठी अपडेट