म्हाडाची मोठी सोडत, आजपासून नोंदणीला सुरवात

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ. अर्थात, म्हाडाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांच्या सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी शुक्रवारपासून (दि.१०) अर्ज नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे, तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.

म्हाडाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

म्हाडाचा फॉर्म कसा भरावा? जाणून घ्या इथे क्लीक करून

एकूण घरे किती? पहा इथे क्लीक करून

घरांच्या किमती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

माडाच्या यापूर्वीच्या जाहिरातींमधून ज्या सदनिकांची विक्री झाली नाही, अशा शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. विकासकांकडून शिल्लक सदनिकांचा अहवाल जसजसा प्राप्त होईल, तसतशा या सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे साकोरे यांनी यावेळी सांगितले.

मात्र, या सोडतीत एकूण सदनिकांची संख्या अद्याप निश्चित झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन अर्ज करण्यास १५ एप्रिलपासून सुरुवात होणार असून, अनामत रक्कम स्वीकृतीदेखील केली जाणार आहे. अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर सदनिका निश्चित करता येणार आहेत. सदनिका निवडल्यानंतर ४८ तासांच्या आत प्रशासकीय रकमेचा भरणा करावा लागणार आहे, तर प्रशासकीय रकमेचा भरणा केल्याची पडताळणी झाल्यानंतर ऑनलाइन देकार अर्थात सदनिका निश्चित झाल्याची प्रत लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

म्हाडाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

म्हाडाचा फॉर्म कसा भरावा? जाणून घ्या इथे क्लीक करून

एकूण घरे किती? पहा इथे क्लीक करून

घरांच्या किमती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा

Leave a Comment