मुंबई, गोरेगाव : म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीत गोरेगावमध्ये घरे मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खरोखरच अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हाडाच्या या पंचतारांकित प्रकल्पातील पात्र सदनिकाधारकांना अपुरा पाणीपुरवठा, घरातील गळती, एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसणे आणि ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरूनही येथील सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. , मात्र, घराचा ताबा दिल्यानंतर या पात्र कुटुंबांच्या समस्या सोडविण्याऐवजी म्हाडाने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे म्हाडा घर विकते की घरासोबत समस्याही असा प्रश्न येथील लाभार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे
एकीकडे म्हाडाने ‘परवडणारी घरे’ म्हणून जाहीर केलेल्या यंदाच्या नवीन लॉटमध्येही विविध उत्पन्न गटांमध्ये सदनिका मिळविण्यासाठी इच्छुकांची धडपडत सुरु आहे. दरम्यान, म्हाडाच्या गोरेगाव येथील प्रकल्प क्रमांक 416 मध्ये सुमारे 2 हजार 683 सदनिका असून त्यापैकी 736 अल्प उत्पन्न गटातील तर 1 हजार 947 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेतील आहेत. या दोन्ही गटातील आठ हजारांहून अधिक नागरिक या प्रकल्पात राहत आहेत. 2023 च्या लॉटरीत या घरांची किंमत अनुक्रमे 46 लाख आणि 30 लाख रुपये होती.
या प्रकल्पात पात्र सदनिकाधारकांनी नोव्हेंबर 2023 मध्ये सदनिकांचा ताबा घेतला, तेथे जाऊन सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता तेथील अडचणींमुळे त्यांना म्हाडाचे घर नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 5-6 महिने 24 टक्के पाणी पुरवठा होत होता. रहिवाशांना दिवसातून एक तासच पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून म्हाडा, मुंबई महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी वारंवार संपर्क साधूनही याबाबत कोणतीही ठोस भूमिका किंवा निर्णय झालेला नाही.
प्रकल्पाचा विकास करणाऱ्या शिर्के बिल्डरने या इमारतीच्या फ्लॅटमध्ये पाणी साठवण्याच्या टाक्या बसविण्याची व्यवस्था केलेली नाही. मात्र, पाण्याच्या समस्येमुळे सदनिकांमध्ये अंतर्गत मोडतोड करुन टाकी बसविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पावसाळा संपल्यानंतरही या प्रश्नाबाबत यंत्रणेची उदासीन वृत्ती पाहून सदनिकाधारकांची निराशा झाली आहे.
दुषित पाणी पुरवठा अन् येणारा दुर्गंध
प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एसटीपी प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र ते पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने फ्लॅट्सना दिले जाणारे पाणी अत्यंत घाणेरडे आणि दूषित असल्याचे आढळून आले आहे. हे पाणी बाथरूममध्ये फ्लशिंगसाठी पुरवले जाते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील फ्लॅटमध्ये फ्लशला पाणी नाही. त्यामुळे या समस्येकडे यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, कुठलीही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या प्रकल्पामुळे आवारात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
नागरिकांचे म्हणणे ऐका…
म्हाडा प्रशासन हे मध्यमवर्गीयांना घरे देण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे लॉटरीत आयुष्यभराची जमापुंजी देऊन येथे फ्लॅट खरेदी केले जातात. पण, इथे राहिल्यानंतर समस्यांची मालिका संपत नाही. त्यामुळे नव्या लॉटरीतही नागरिकांनी सदनिकांची जाहिरात बघून हुरळून न जाता योग्य तो निर्णय घ्यावा. म्हाडा, पालिका आणि लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद न मिळाल्याने सदनिकाधारक सध्या चिंतेत आहेत. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फ्लॅट मालकांनी म्हाडा प्रशासनाला अनेक पत्रे लिहून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारीही केल्या. मात्र असे असतानाही परिस्थिती जैसे थेच असल्याचे बोलले जात आहे.
पहा म्हाडा मुंबई लॉटरी टॉप 5 लोकेशन
वाचा : मुंबईत म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त व सुंदर घर; पाहा कुठे अन् किंमत किती
Nice gariba n ghar mileltysm