मुंबईत 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार; म्हाडा योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या

Mhada Lottery Mumbai: म्हाडा मुंबई विभागासाठी घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. यामध्ये गोरेवार, विक्रोळी, पवई येथील घरांचा समावेश आहे. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई विभागातील पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या किमतीत 1.92 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये घराची किंमत 30 लाख 44 हजार रुपये होती. मात्र, आता विजेत्या अर्जदारांना या घरांसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. मुंबई विभागातील गोरेगाव, पहाडी येथील 1,900 घरे PMAY योजनेअंतर्गत आहेत.

2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. PMAY योजनेनुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे त्यांनी अर्ज केला होता. या घरांचे सर्वत्र खूप कौतुक झाले. मात्र, विजेत्यांनी इतर कारणांमुळे घरे म्हाडाला परत केली. PMAY चे 88 विजेत्यांनी परत केली होती. त्यामुळे या घरांचा 2024 च्या लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, यावेळी घरांच्या किमती वाढल्या आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेत 88 घरांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार घरांच्या किमतीत अडीच लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच प्रत्येक घराची किंमत 2 लाख 52 हजार रुपयांनी वाढली आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.

घरांच्या किमती वाढल्यानंतर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर मुंबई मंडळाने दरात कपात केली होती. मुंबई बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 56 हजार रुपयांनी किंमत कमी करण्यात आली होती. आता या घरांची किंमत 32 लाख 36 हजार रुपये असेल. नियमानुसार, व्याजदर लागू करून किंमती निश्चित केल्या जातात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता 1 लाख 92 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ही कागदपत्र लागणार

वाचा : आनंदाची बातमी ! म्हाडा ‘या’ शहरात बांधणार नवीन 1533 घरे, कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प ?

7 thoughts on “मुंबईत 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार; म्हाडा योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या”

Leave a Comment