खुशखबर! मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पहा संपूर्ण घरांच्या किमती

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतची तारीख म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केली. त्यानुसार गुरुवारी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून 13 सप्टेंबर रोजी लॉटरीची घोषणा होणार आहे. त्यानंतर अर्ज विक्री-मंजुरी प्रक्रिया सुरू होईल.

2019 नंतर, मुंबई मंडळाने 2023 मध्ये 4,082 घरांची सोडत काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे रिकामी राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या घरांसह नवीन घरांची रूपरेषा तयार करण्याचा विचार सुरू होता. परंतु घरांची जुळवाजुळव करण्यास वेळ लागला आणि सोडतीला विलंब झाला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला असून आता अखेर मुंबई मंडळाने लॉटरी जाहीर केली आहे.

मुंबईतील तारदेव, दादर, कोळे कल्याण, पवई, जेव्हीपीडी, गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी – कन्नमवारनगर, पवई इत्यादी ठिकाणी 2023 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. सोडतीमध्ये सर्वात कमी गटातील 359 घरे, कनिष्ठ गटातील 627 घरे, मध्यम गटातील 768 घरे आणि उच्च गटातील 276 घरांचा समावेश आहे. सोडीमध्ये म्हाडाळा 33(5), 33(7) आणि 58 अंतर्गत विविध पुनर्विकास प्रकल्पांमधून अधिग्रहित केलेल्या 370 घरांचा समावेश असलेल्या 2030 घरांचा समावेश आहे. तर 333 घरे विखुरलेली आहेत आणि 1,327 घरे मुंबई मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पांची आहेत.

सोडत 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल सोडतपूर्व प्रक्रिया सुरू करणार आहेत. सोडतीची पूर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. ठेव रक्कम आणि उत्पन्न गट मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. अर्जाचे शुल्कही 590 रुपये ठेवण्यात आले आहे.

  • जाहिरात – 8 अगस्त
  • अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरुवात – 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख, वेळ – 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत
  • आरटीजीएस, डेबिट कार्ड इत्यादी सुविधेमार्फत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत
  • प्राप्त अर्जांची प्रारुप यादी – 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता
  • अर्जाची अंतिम यादी – 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता
  • सोडतीचा निकाल – 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता

46 thoughts on “खुशखबर! मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पहा संपूर्ण घरांच्या किमती”

  1. आयुष्यात स्वताच 🏡 घ्याच स्वपन सर्वच बघत असतात म्हाडा मुळे हे शक्य होते आहे

    Reply
  2. सर्व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला त्याबद्दल आभार.

    Reply

Leave a Comment