नवी मुंबई : तळोजा व द्रोणागिरी येथील गृहप्रकल्पातील विक्री न झालेल्या 3200 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर विक्री करण्यासाठी सिडको योजना जाहीर करणार आहे. या 3200 सदनिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अधिक सदनिका उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे सिडकोच्या या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Navi Mumbai 3200 unsold flats in housing projects in Taloja and Dronagiri will be sold on first-come-first-served basis.
सन 2019 सिडकोने ‘मास हाऊसिंग’ योजना राबविली होती. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 8183 व अल्प उत्पन्न घटकासाठी 14974 अशा मिळून एकत्रित 23 हजार 157 सदनिका उभारण्यात आल्या होत्या. यापैकी जवळपास 20 हजार यशस्वी अर्जदारांना सदनिकांचे वाटपपत्र सिडकोने पाठविले होते. त्यापैकी सुमारे 12 हजार 500 सिडकोने सदनिकाधारकांसोबत करारनामा केला आहे.
विशेष म्हणजे 2019 मास हाऊसिंग योजनेतील तीन हजार 563 सदनिका शिल्लक राहिल्या होत्या, त्यापैकी तीन हजार 322 सदनिकांची योजना 26 जानेवारी 2024 रोजी सिडकोने जाहीर केली होती. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 312 व अल्प उत्पन्न घटकासाठी 3010 सदनिकांचा समावेश आहे. या योजनेची संगणकीय सोडत सिडकोने 19 जुलै रोजी काढून यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर केली आहे.
वाचा : म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
या योजनेत सिडकोच्या – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या 312 सदनिका – उत्तम प्रतिसाद लाभला आहे. मात्र, – अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या 3010 सदनिकांना फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यामुळे त्या शिल्लक घरांचा समावेश करून सिडको येत्या गणेशोत्सवात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या धर्तीवर तळोजा व द्रोणागिरी येथील 3200 सदनिकांसाठी योजना जाहीर करणार आहे.
वाचा : MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती झाल्या कमी? पाहा संपूर्ण यादी
गेल्या 10 वर्षांत सिडकोने निर्माण केलेल्या गृहप्रकल्पांत शिल्लक राहिलेल्या घरांची संख्याही लक्षणीय आहे. आठ ते 10 वर्षांपूर्वीच्या गृहप्रकल्पातील घरांची झालेली दुरवस्था व त्या घरांना सिडको आकारत असलेली किंमत ही आताच्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांच्या किंमतीएवढी असल्यामुळे सिडको व्यवस्थापनाला जुन्या गृहप्रकल्पांतील शिल्लक राहिलेल्या घरांच्या किंमतींबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे.
वाचा : मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना ITR पासवर्ड टाकावा लागणार
दहीहंडीच्या मुहूर्तावर सिडकोने शिल्लक राहिलेल्या 902 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या योजनेत 20 टक्के सवलत दिली असली तरी घरांची आकारण्यात आलेली किंमत ही जास्त असल्याचे घर खरेदीदारांचे म्हणणे आहे.
वाचा : मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती