मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाने गुरुवारी (8 ऑगस्ट) 2,030 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून शुक्रवार, 9 ऑगस्टपासून अर्जांची विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. इच्छुक ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात. 26 दिवसांचा हा कालावधी खूपच कमी आहे. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी, रकमेची जुळणी करण्यासाठी फक्त 26 दिवसांच्या कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश सरकारचे आहे. मात्र, या घाईचा थेट परिणाम इच्छुकांनवर होण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. अर्ज भरणे आणि सबमिट करणे या प्रक्रियेसाठी किमान 45 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. याअंतर्गत आतापर्यतची मुदत अनेक वेळा वाढवून देण्यात आली आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. ही कागदपत्रे सादर करण्यासाठी उमेदवारांना ठराविक कालावधी लागतो. जुन्या लॉटरी प्रक्रियेनुसार लॉटरी विजेत्याला कागदपत्रे सादर करावी लागत होती. तथापि, आता अर्जदारांची पात्रता सोडतीपूर्वी निश्चित केली जाते आणि सोडतीमध्ये केवळ पात्र अर्जदारांचा समावेश केला जातो. त्यामुळे अर्जाच्या वेळी पात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
इच्छुकांकडून अनामत रकमेची जमवाजमव
जाहिरातीनुसार, अर्जांची विक्री आणि स्वीकृती 9 ऑगस्टपासून सुरू होईल आणि ही प्रक्रिया 4 सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी 45 दिवसांऐवजी फक्त 26 दिवस मिळतील. हा कालावधी खूप कमी आहे. म्हाडाची प्रक्रिया ऑनलाइन आणि सोपी असली तरी उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आणि अनामत रक्कम जमा करण्यासाठीही वेळ लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत अनेक उमेदवार सोडतीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. आचारसंहितेपूर्वी लॉटरी काढावी, यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याची चर्चा म्हाडात आहे. 13 सप्टेंबर रोजी हस्टी ड्रॉ काढण्यात येणार आहे
वाचा : खुशखबर! मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पहा संपूर्ण घरांच्या किमती
Nice home
Give full detail about howmuch the applicant has to pay with form
Mast
अर्ज करण्यासाठी खूप कमी कालावधी दिला आहे संशयाला जागा आहे.आचारसंहितेच्या नावाखाली जनतेची पिळवणूक होत आहे.
Apply The mhada
Give me up dates
I want to apply
I WANT TO APPLY BUT ERROR IS COMING THAT MYMOBILE NO IS ALREADY EXIST ,SO PLEASE HELP ME NOW THAT WHAT CAN I DO NOW PLEASE HELP ME
registrations kaise karna