मुंबईत फक्त १२ लाखांत घर; ४,७०० घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार

मुंबईत स्वतःचे घर प्रत्येकाला घ्यायचे असते. पण अनेक लोकांचे स्वप्न हे अपूर्ण राहते, कारण घरांची किंमत त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण सर्वसामान्य लोकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमचे घर १२ लाख रुपयांना खरेदी करू शकता.

म्हाडाच्या धर्तीवर, महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील माहुल परिसरात ४,७०० घरे बांधण्यात आली आहेत. या घरांची किंमत १२ लाख ६० हजार रुपये असून ही घरे लॉटरीद्वारे विकली जातील. सोमवारपासून महानगरपालिकेचे कर्मचारी या घरांसाठी अर्ज करू शकतील.

गेल्या काही दिवसांत माहुलमधील १३,००० हून अधिक घरांना खरेदीदार मिळालेले नाहीत. म्हणून, बीएमसी म्हाडामार्फत या घरासाठी लॉटरी काढणार आहे. बऱ्याच काळापासून रिकामे पडून असलेल्या या सदनिका देखभालीचा खर्च पालिकेला करावा लागत आहे. त्यामुळे आता हे फ्लॅट्स मालकीच्या आधारावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएमआरडीएने प्रकल्पग्रस्तांसाठी इमारती बांधल्या आणि त्यातील फ्लॅट्स महापालिकेला हस्तांतरित केले. विविध विकास प्रकल्पांमध्ये घर बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना माहुल येथील सदनिकांमध्ये राहण्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.

मुंबई, ठाण्यासह ‘या’ शहरांत म्हाडाची जबरदस्त योजना, 2 हजार घरांसाठी सोडत

ही संधी चुकवू नका..! ठाणे नवी मुंबईत म्हाडाच्या घरांची थेट विक्री

Leave a Comment