नवी मुंबई : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सिडको महामंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.27) सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ करण्यात केला. या सदनिकांमध्ये कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोड्समधील 213 फ्लॅट्स आणि खारघरमधील व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन होम कॉम्प्लेक्समध्ये 689 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको सातत्याने गृहनिर्माण योजना राबवते. यंदाच्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने उपलब्ध असलेल्या 902 सदनिकांची गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोड्समध्ये उपलब्ध असलेल्या 213 सदनिकांपैकी 38 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर 175 सदनिका सर्वसाधारण वर्गासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय खारघरमधील व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन होम कॉम्प्लेक्समध्ये उपलब्ध असलेल्या 689 फ्लॅटपैकी 42 फ्लॅट्स आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, 359 फ्लॅट अल्प उत्पन्न गटासाठी, 128 फ्लॅट्स मध्यम उत्पन्न गटासाठी आणि 160 फ्लॅट्स उच्च उत्पन्न गटाकरिता आहेत. सर्व उत्पन्न गटांसाठी फ्लॅट्स उपलब्ध आहेत. ,
योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 27 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल. या योजनेसाठी संगणकीकृत सोडत 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसोबतच या योजनेची सविस्तर माहिती सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाचा : मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना ITR पासवर्ड टाकावा लागणार
Good job