मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई : राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना घरे मिळवून देण्यासाठी नुकतीच म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतील घरांच्या किमती पाहून नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हाडाने या घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. याशिवाय म्हाडासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखही 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

There are flats in various housing projects in Mumbai including Reggaon West, Antop Hill-Wadala, Kopri Powai, Kannamwar Nagar-Vikhroli, Shivdham Complex-Malad, Dadar, Lower Paral, Powai. Among these, Mhada has shared a video of a grand flat in Powai.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने यावर्षी 2030 घरांसाठी लॉटरी (म्हाडा लॉटरी 2024) काढली. गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ, पवई यासह मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यापैकी म्हाडाने पवईतील भव्य फ्लॅटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

म्हाडाच्या पवईतील लॅव्हिश फ्लॅटमध्ये तुम्ही या फ्लॅटचे डिझाईन, कार्पेट एरिया, फर्निचर आणि टॉयलेट बाथरूम पाहू शकता. पवईतील हे घर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना नक्कीच आवडेल. कारण, सुंदर लूक, वेल डेकोरेटेड आणि आधुनिक स्वयंपाकघरासारख्या सुविधांनी युक्त हा स्टायलिश फ्लॅट तुमची वाट पाहत आहे. मुंबईच्या पवई उपनगरातील गृहनिर्माण प्रकल्पात तुम्हाला हे घर म्हाडाच्या लॉटरीद्वारे मिळू शकते.

म्हाडाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओसह माहितीही शेअर करण्यात आली आहे. “म्हाडाने पवईमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज फ्लॅट्ससह एक सुंदर गृहनिर्माण प्रकल्प तयार केला आहे आणि या गृहनिर्माण प्रकल्पाचा मुंबई लॉटरीत समावेश करण्यात आला आहे.

पहा म्हाडाचा 2BHK प्राईम लोकेशन असणारा फ्लॅट

वाचा : म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर

Leave a Comment