म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अशा परिस्थितीत सणापूर्वी मायानगरी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. लॉटरी अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबई विभागातील 370 घरांच्या किमती कमी केल्या आहेत.

या नवीन प्रणालीमुळे अर्जदारांची सुमारे 2 ते 5 लाख रुपयांची बचत होणार आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून घेतलेल्या 370 घरांच्या किमतीवर 10 ते 25 टक्के कर कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असून म्हाडाच्या घरांच्या किमती सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी जाहीर केलेल्या किमतीच्या तुलनेत कमी केल्याचा आनंद असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लॉटरीतील घरांच्या किमतीत 25 टक्के कपात करण्याची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आणि सांगितले की EWS श्रेणीतील घरांसाठी कमाल 25% कपात करण्यात आली आहे, तर इतर श्रेणीतील घरांची किंमत देखील कमी करण्यात आली आहे.

म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? पहा व्हिडिओ

वाचा : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता एकऐवजी पाच विजेते

1 thought on “म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर”

Leave a Comment