मुंबई : आता तुमचे स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता ठाण्यात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. काही महिन्यांत, म्हाडा कोकण मंडळ ठाणे परिसरातील सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे.
गेल्या दीड वर्षात, म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटऱ्या आयोजित करून सुमारे दहा हजार लोकांचे घर घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. आता कोकण मंडळ या वर्षी पुन्हा सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी करत आहे.
म्हाडा कोकण मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या लॉटरीत ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक 1 हजार 173 घरांचा समावेश असेल. म्हाडाने चितळसरमध्ये 22 मजल्यांच्या 7 इमारती बांधल्या आहेत. परंतु या भागात पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगरपालिकेने अद्याप इमारतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने सोडतीचे काम लांबले आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येथील घरांचाही लॉटरीत समावेश केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
म्हाडाच्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; इच्छुकांसाठी मोठी अपडेट