म्हाडाचा मरीन लाईन्स येथे 2 BHK फ्लॅट, सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील 2030 घरांच्या नोंदणीसाठी लॉटरी जाहीर केली. या घरांसाठी अर्जांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली होती. म्हाडाने यापूर्वी 4 सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती. अर्ज नोंदणीसाठी 26 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाच्या घरांच्या नोंदणीची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 10 दिवस उरले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांनी मुदतीची वाट न पाहता लवकर अर्ज दाखल करावेत.

मुंबईत म्हाडाची घरं कोणत्या भागात?

म्हाडाने मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यासह मुंबईतील विविध भागातील घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे.

2 bhk left in various areas of Mumbai including Goregaon West, Antop Hill-Wadala, Kopri Powai, Kannamwar Nagar-Vikhroli, Shivdham Complex-Malad, Dadar, Lower Paral

पहा मरीन लाईन्स येथील 2 BHK फ्लॅट

घरांच्या किमती झाल्या कमी

म्हाडाने मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किमती म्हाडाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने घरांच्या किमती 12 लाखांवरून 75 लाखांपर्यंत कमी केल्या आहेत.

वाचा : नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

म्हाडाने नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्जांची नोंदणी, 19 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहेत. घरांसाठीची अनामत रक्कमही 19 सप्टेंबरपर्यंत भरावी लागणार आहे. यानंतर या घरांची सोडत म्हाडाकडून 8 ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे. लॉटरीत कोणाला घर मिळाले आणि कोणाला नाही याची माहिती त्याच दिवशी मिळणार आहे. ज्या अर्जदारांना घरे मिळालेली नाहीत, त्यांच्या खात्यात 9 ऑक्टोबरपासून अनामत रक्कम जमा केली जाणार आहे.

वाचा : मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

म्हाडाच्या मुंबई विभागाच्या यंदाच्या लॉटरीसाठी अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील पात्र नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.

वाचा : MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती झाल्या कमी? पाहा संपूर्ण यादी

अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांचे उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असावे. तर अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांचे उत्पन्न 9 लाखांपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.

वाचा : म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर

Leave a Comment