म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता एकऐवजी पाच विजेते

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर 2024 च्या सोडतीची प्रतीक्षा यादी अखेर वाढवण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 10 घरामागे प्रतिक्षा यादीत पाच विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी प्रत्येक 10 पैकी एका अशी प्रतीक्षा यादी होती.

म्हाडाच्या सोडती प्रक्रियेत बदल करून आता सोडतीपूर्वी पात्रता निश्चित केली जात आहे. त्यामुळे सोडतीनंतर घरांचे वाटप करताना मोठ्या संख्येने विजेत्यांना अपात्र ठरवण्याचा कोणताही मुद्दा नसल्याचे स्पष्ट करत प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा विचार पुढे आला.

प्रतीक्षा यादी रद्द करण्याची मागणी करताना प्रतीक्षा यादीतील घरांच्या वाटपात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. तथापि, सोडतीपूर्वी पात्र ठरलेले विजेते कोणत्याही कारणास्तव घर नाकारू शकतात. त्यामुळे ती घरे बदलून इतरांना संधी मिळावी यासाठी प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रतीक्षा यादीही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2023 च्या सोडतीत केवळ 10 टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. म्हणजेच, 10 घरामागे एक विजेता असे त्याचे स्वरुप होते.

शेवटच्या सोडतीत सामाजिक आरक्षण व इतर आरक्षित प्रवर्गातील काही घरांची प्रतीक्षा यादी कमी असल्याने विक्री झाली नाही. या घरांसाठी अर्जदारांची संख्या मोठी होती. मात्र प्रतीक्षा यादी कमी असल्याने त्यांनाही घर मिळू शकले नाही. घराची विक्री न झाल्याने म्हाडाचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 13 सप्टेंबर 2024 च्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादी 10 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा 10 घरांनंतर प्रतिक्षा यादीत 5 विजेते घोषित केले जातील.

गेल्या वर्षी 10 घरांनंतर प्रतिक्षा यादीतील विजेत्याची घोषणा करण्यात आली होती. प्रतिक्षा यादीतील विजेत्यांची संख्या वाढल्याने विक्री न झालेल्या घरांची संख्या कमी होईल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन लॉटरी प्रक्रिया लागू होण्यापूर्वी एका घरामागे एक अशी प्रतीक्षा यादी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. अशी अनेक उदाहरणे समोर आली होती.

वाचा : मुंबईत म्हाडाच्या गोरेगाव येथील घरासाठी अर्ज करताय, तर हे वाचाच…!

Leave a Comment