Cidco lottery 2024 : काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईतील अँटॉप हिल, गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर आणि इतर काही भागात घरांची योजना जाहीर केली होती. एकीकडे म्हाडाने गृहनिर्माण योजना जाहीर करत लगेच घरांच्या किमती जाहीर केल्या व अर्ज भरण्यासाठी सुविधा लगेच उपलब्ध करून दिली.
म्हाडाची ही सोडत गणेशोत्सवादरम्यान जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता असतानाच आता सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिडकोची योजना लांबणीवर पडल्याची चर्चा असतानाच आता या आराखड्याला मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण, सिडको महामंडळाने कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 902 घरांची योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ही योजना 27 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोड्समधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 आणि सर्वसाधारण गटासाठी 175 असे एकूण 213 सदनिका या योजनेचा भाग असतील. या योजनेत सिडकोच्या स्वतःच्या स्वप्नपूर्ती आणि खारघरमधील वास्तुविहार सेलिब्रेशन कॉम्प्लेक्समधील 689 घरांचाही समावेश असेल. ज्यासाठी इच्छुकांनी अर्ज करणे अपेक्षित आहे.
ही घरे रेल्वे स्थानके, रस्ते, मेट्रो सेवा आदी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या परिसरांमध्ये ही घरे आहे. या भागात सिडकोच्या घरांसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येते. शिवाय, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प या संकुलांच्या जवळ असल्याने इथ बदलच्या शहराचे साक्षीदार होण्याची संधी योजनेतील विजेत्यांना मिळणार आहे हे नाकारता येत नाही.
वाचा : मुंबई म्हाडा लॉटरीला अल्प प्रतिसाद, 50 हजारांचा पल्ला गाठणार नाही?