Pune : पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 हजार 190 फ्लॅट बांधण्यात येत आहेत. या योजनेत पुणेकरांना नवीन 2 bhk फ्लॅट घेण्याची संधी मिळणार आहे. 1 thousand 190 flats are being constructed in Pune under Pradhan Mantri Awas Yojana. Pune residents will get a chance to buy a new 2 bhk flat in this scheme.
यासाठी शहरात राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून 30 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डुडुळगाव येथे महापालिकेच्या माध्यमातून घरे बांधण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 30 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांकडून या प्रकल्पांमधील सदनिकांची मागणी करण्यात येत आहे.
महापालिकेकडे ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करून लाभार्थी निश्चित केले जातील. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डुडुळगाव येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी शासन आणि लाभार्थी यांच्यातील भागीदारी पुढीलप्रमाणे असेल. फ्लॅटची एकूण किंमत 16 लाख 64 हजार 173 रुपये असेल. यामध्ये केंद्र सरकार प्रतिसदनिका 1 लाख 50 हजार रुपये तर राज्य सरकार प्रतिसदनिका 1 लाख रुपये अनुदान देणार आहे. प्रतिसदनिका 14 लाख 14 हजार 173 रुपये लाभार्थ्याला भरावे लागणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
अटी व शर्ती
या योजनेसाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन माध्यमातूनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत असावे, अर्जदार किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे भारतात कुठेही घर नसावे, चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केला आहे परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आकुर्डी, परंतु प्रतीक्षा यादीत यापूर्वी सदनिका न मिळालेले नागरिक नव्याने अर्ज करू शकतात.
ही कागदपत्रे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे उत्पन्नाचा पुरावा (सन 2023-24) किंवा 1 वर्षाचा आयकर रिटर्न (ITR) किंवा फॉर्म 16/16A (सन 2023-24) असणे आवश्यक आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे (उपलब्ध असल्यास)
- आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे) पिंपरी चिंचवड शहरातील
- पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार)
- बँक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला चेक
- मतदान ओळखपत्र (अर्जदार) पिंपरी चिंचवड शहरातील
- भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी किमान रुपये ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
- संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहात असल्यास त्यांचे किमान र. रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र) पिंपरी चिंचवड शहरातील, वीज बिल (चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील) पिंपरी-चिंचवड शहरातील
- अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल दाखला) फक्त महाराष्ट्रातील रहिवासी.
आरक्षण निहाय सदनिकांची माहिती
या योजनेंतर्गत वाटप केलेल्या सदनिकांची आरक्षणानुसार विभागणी केली जाते. यामध्ये 595 सदनिका सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 155 सदनिका अनुसूचित जातीसाठी, 83 सदनिका अनुसूचित जमातीसाठी आणि 357 सदनिका इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणनिहाय प्रभागात अपंग नागरिकांसाठी 5 टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10,000 रुपये अनामत रक्कम आणि 500 रुपये नोंदणी शुल्क देखील ऑनलाइन अर्जासोबत ऑनलाइन स्वीकारले जाईल. ज्या नागरिकांनी फ्लॅटची लॉटरी जिंकली नाही आणि त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत आले नाही, त्यांच्या ठेवीची रक्कम योजनेचा अर्ज भरताना नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाइन परत केली जाईल.
इथे करावा अर्ज
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पात्र अर्जदारांनी https://pcmc.pmay.org ला भेट द्यावी. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या योजनेबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
वाचा : म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांसाठी सोडत, नवीन तारखा जाहीर?